Tuesday, 31 March 2020

द्वारकानाथ शांताराम कोटणीस: सोलापूर आणि चीन ऋणानुबंध


द्वारकानाथ शांताराम कोटणीस: (१०/१०/१९१० - ०९/१२/१९४२) मानव सेवामध्ये जीवन अर्पीत करणाऱ्या महान विभूतीमध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे नाव मोठ्या आदर व गर्वाने घेतले जाते. द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे भारत चीन मैत्री संबंध व सहयोगाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. १० अक्टोबर १९१० रोजी महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे कोटणीसांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कोटणीसांना दोन भाऊ व पाच बहिणी होत्या. यांना मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी व  चीनी भाषा अवगत  होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठच्या सेठ जी.एस.मेडीकल कॉलेज मध्ये वैध्यकशास्त्राची पदवी घेतली. पुढे चीन येथे १९३९ ते १९४२ दरम्यान कोटणीसांनी चीनी सैन्य व जनतेची सेवा केली.
१९४० मध्ये चीन योथील बेथ्यून इंटरनेशनल पीस हॉस्पिटल मधील परिचारीका गुओ किंगलनशी विवाह. चीनमध्ये २३ ऑगस्ट १९४२ रोजी द्वारकानाथ व गुओ किंगलन च्यापोटी युन्हुआ या मुलाचा जन्म झाला . पुढे वयाच्या २४ व्या वर्षी याचा मृतू झाला. द्वारकानाथ कोठणीसाची पत्नी गुओ किंगलन हयात असे पर्यंत (२०११) सोलापुरात  कोठणीस कुटुंबियांची अनेक वेळा भेट घेतली. गुओ किंगलन नी ‘माय लाइफ विथ कोठणीस’ या आपल्या जीवनीत भारतीय लोक खूप चांगले आहेत हे सर्व त्यांच्या सभ्यता व संस्कृतीचे प्रतीक असेल’ असे नमूद केला आहे.
चीनकडे भौतिक साधनांचा अभाव असल्याने त्याने अनेक राष्ट्रातील स्वातंत्र्यप्रेमी नेत्यांना पत्रे पाठून वैध्यकीय मदत मागितला. २६ नोव्हेंबर १९३७ रोजी चीनी लाल सैन्याच्या आठव्या तुकडीचे प्रमुख जनरल ‘च्युतेह’ नी जवाहरलाल नेहरुना पत्र लिहून शस्त्रक्रियेची उपकरणे, औषधे, डॉक्टर व परिचारिका पाठविण्याची विनंती केली. नेहरूंनी चीनला मदत करण्यासाठी भारतीय कॉंग्रेस कमिटीस वैद्यकीय पथक पाठीण्याचे आव्हान केले. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीमध्ये अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्णय घेऊन एक समिती स्थापन केले. या समितीचे प्रमुख डॉ.जीवराज मेहता होते. नेहरूनी आव्हान केलेल्या चीनी पथकात एम.आर.चोलकर, विजयकुमार बसू व डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश होता. भारतीय कॉंग्रेस कमिटीने या वैद्यकीय पथकास २२००० रुपये फंड दिला.
१ सप्टेंबर १९३८ रोजी मुंबईमध्ये जीना सभाग्रहात मुंबईच्या काँग्रेस कमिटीने सभेचे आयोजन करून वैधकिय पथक चीनकडे पाठवीले. कोटणीसांनी चीन युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर हजारो सैनिक व जनतेची सेवा केली. सैन्याची सेवा करत असताना ९ डिसेंबर १९४२ रोजी वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले. कोटणीसांच्या निधनानंतर संपूर्ण चीनमध्ये कोटणीसांबद्ल आदर्श ठेवा मोहीम काढण्यात आली. अनेक चीनी वर्तमानपत्रांनी कोटणीसांच्या समर्पीत जीवनाबद्दल लेख लिहिले. कॉ. माओ, चौ.एन.लाय, ज. च्युतेह, व डॉ. सन यत सेन यांनी कोटणीसांचा गौरव केला. भारत व चीनने टपालावर कोठनीसांची मुद्रा छापण्यात आली. त्यांच्या निधनानंतर ही त्यांची निस्वार्थ सेवा, धाडस, समर्पण, आणि बलीदानाला आज ही चीनवासी आदराने स्मरण करतात.
पुढे चीनमध्ये कोटणीसांच्या स्मरणार्थ तीन ठिकाणी स्मारके उभारण्यात आली. कोटणीस ज्या परिसरात प्रत्यक्ष युद्धभूमीवर चीनी सैन्याची सेवा केली त्याठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ डॉ. वेश्यन आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल उभारले. ९ डिसेंबर १९७६ रोजी या हॉस्पिटलमध्ये द्वारकानाथ कोटणीस स्मृती सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तांग कौंटी संग्रहालयांमध्ये कोटणीसांचे छायाचित्र ठेवण्यात आल्या आहेत. भारतात ख्वाजा अहमद अब्बास याने कोटणीसांवर ‘कोटणीस कि अमर कहानी’ हा चित्रपट बनवला. १९८२ साली ‘डीई ड्यू हुआ डाई फू’ या चीनी चित्रपटात कोटणीसांची जीवनी घेण्यात आली आहे.
१ सप्टेंबर २००९ रोजी चीनने ६० व्या स्वातंत्र्यदिननिमित भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. यावेळी चीनी आंतरराष्ट्रीय रेडिओ, चीनी आंतरराष्ट्रीय मित्र संघटना व चीनी सरकारी विदेशी विशेषज्ञ ब्युरो यांनी संयुक्तपणे चीनचे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मित्र निवडण्यासाठी महाजालवर जनतेकडून मते घेतली. चीनी जनता ५ कोटी ६० लाख मते नोंदून पहिल्या १० व्यक्तीमध्ये डॉ. कोटणीसांची निवड केली. ८ डीसेंबर २००९ रोजी बीजिंग येथील ग्रेट हॉल ऑफ पीपल या सभागृहात कोटणीस कुटुंबियाना आमंत्रित करून गौरव पत्र प्रदान करण्यात आला. डॉ. कोटणीस यांचे बलिदान, त्याग, व आदर्श याचे सतत जाणीव व्हावी या उद्देशाने सोलापूर येथे भव्य स्मारक बांधण्यात आला आहे.
संदर्भ सूची:
1.        दुधारीया. एच., इम्मारटल स्टोरीज ऑफ डॉ. डी.एस. कोटणीस आन्द डॉ.नोर्मन बेथूने, युनिस्टर बुक्स प्रायवेट लिमिटेड, २०१२
2.        कोटणीस मंगेश., समर्पण, डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांची जीवनगाथा, परिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर, १९८३
3.        पुंडे नीलकंठ., सोलापूरच्या राजकीय जागृतीचा इतिहास, सुविधा प्रकाशन, सोलापूर, २०१२.
4.        केतकर कुमार., कथा स्वातंत्र्याची, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास मंडळ, पुणे, १९८५
5.        डॉ. कोटणीस यांची बहीण मनोरमा कोठणीस (१९२१-२०१५) यांची यु ट्यूब वरील मुलाखत https://www.youtube.com/watch?v=WFoqR5usqhA
6.        कोटणीस कि अमर कहानी चित्रपट https://www.youtube.com/watch?v=hp-T3QPjuYk




0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home